Saturday 15 May 2010

फोबिया

फोबिया
an anxiety disorder characterized by extreme and irrational fear of simple things or social situations

फोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी.  यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात.  मलाही एक(?) विचित्रच फोबिया आहे.

आधीपासुन आधीचं सांगतो,  लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल.  इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली. 

शाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्‍य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्‍या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.

सद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे.  मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.

तर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.