Saturday 27 February 2010

रोड, मुवी

रोड, मुवी
अभय देओलचा ’रोड, मुवी’ येतोय, टोरंटो फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवला गेलेला हा चित्रपट चांगला असणार यात शंकाच नाही...





सर जो तेरा चकराये......
http://www.youtube.com/watch?v=nUBwfcYR2-I

Wednesday 10 February 2010

बजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात

बजाज डिस्कवर या बाईकच्या जाहीराती खुपंच कल्पक असतात.  शनी शिंगनापुरबद्दलची ही जाहीरात अशीच सुंदर आहे....

Tuesday 2 February 2010

ओपनिंग क्रेडीट्स -१

कुठल्याही चित्रपटासाठी, मालिकेसाठी ओपनिंग क्रेडीट्स अत्यंत महत्वाचे असतात, मुख्य अभिनेत्यांच्या नावासकट इतर महत्वाच्या क्रेडीट्स करिता यांचा चांगला उपयोग होतो.  यातही केवळ नावं न दाखवता खुप सुंदर प्रयोग झाले आहेत, ओपनिंग क्रेडीट्स मध्येच सिनेमाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात येतो, आणि दिग्दर्शकाची कमाल दिसुन येते.  इथे वानगीदाखल अशा काही विशेष ओपनिंग क्रेडीट्स बद्दल आपण पाहु. तुम्हालाही एखादा असा सिनेमा आणि त्यातील ओपनिंग क्रेडीट्स आठवत असल्यास जरुर लिहा....

चित्रपट - लॉर्ड ऑफ वार (२००५)
२००५ सालच्या या चित्रपटाचा विषय आहे, शस्त्र आणि त्यांच्या घातक परिणामांबद्दल.  या सिनेमाच्या ओपनिंग क्रेडीट्स मध्ये एक बुलेट रशियाच्या एका कारखान्यात कशी बनते, बनल्यानंतर आफ्रिकेला पाठवली जाते आणि शेवटी एका अफ्रिकन मुलाचा कसा जीव घेते हे दाखवले आहे...




क्रमश: