काल रात्री घरी जाण्यास खुप उशिर झाला, रात्रीचे २ वाजले, कंटाळुन निघालो आणि जाताना शहराची एका वेगळ्या द्रुष्टीने ओळख झाली.
रात्रीच्या निरवं शांततेत, एरवी भकास दिसणारे शहर खुपचं सुंदर दिसु लागते.
रस्ते, जे वाहनांच्या गर्दीत एरवी हरवलेले असतात त्यांचं अस्तित्व दिसु लागते, खड्डे सोडुन रस्ता देखिल आहे, आणि तो सुंदर सुद्धा दिसतो याची जाणिव होते...शांत शांत इमारती आणि गोंगाट विरहीत वातावरण नकळत मनाला गुदगुल्या करतं. थंड, प्रदुषणरहीत हवा तजेला देते.
आणि एरवी १-२ तासाचा ट्रॅफ़ीकशी झगडत केलेला प्रवास आता केवळ २० मिनिटात संपतो.
No comments:
Post a Comment