Tuesday, 5 April 2011

पूनम का चांद

पूनम पांडे.. बस नाम ही काफी है!.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं!!! या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...
आफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की 
आपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)
इथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)

Friday, 18 March 2011

बझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)

बझ्झनांचे अल्टरनेट बिझनेस...
देवकाका - प्रकाशक होतील
सुझे - साखि विकेल (हॉटेलात बसून... सायकल वर नव्हे ;) ))))
दे.गा. - शिक्षक होतील
विभि - पिझ्झा हट मध्ये काम करेल.. आणि हो मस्का सुद्धा विकेल.. ;)
आप - बिर्याणी बनवेल.. आपोळी नावाचा असह्य प्रकार सुद्धा करेल ;)
दीप - चारोळीकार बनेल.. (सगळ्या चारोळ्या एका कॅफेमध्ये सुचतिल.. योगायोग बरं केवळ)
सपा - घर शोधुन देईल लोकांना .. (ब्रोकर) ;)
देचु - गुजरात बॉर्डरवर तस्करी ;)
महेंद्रकाका - कॉलमनिस्ट बनतील
माऊताई - शेफ
योमुं - बेकरी उघडेल
आका - सिंहगडावर धुक्यात हरवणार्‍यांना रस्ता सापडून देईल
श्रेता - बॅटींग कोच (षटकार स्पेशलिस्ट) ;)
साबा - इन्स्टॉलेशन्स और क्या...? ;)
हेरंब - गावाच्या पंचायतीत न्याय निवाडा करेल ;) (त्यातही पार्टटाईम मॅगी वडे तळून देईल ;) )
मीनल - कोल्हापुरी चपलांचं दुकान उघडेल ;)
तन्वीताई - ब्लॉगवरच्या विचित्र निनावी अन खोट्या कॉमेंट्स हँडल करण्यात मदत करेल... :P (साभार विभि)
कांचनताई - डिटेक्टिव्ह ;) (साभार देचु)
सिद्धार्थ - हापूस विकेल... सोबत बीएसएनएलचं ब्रॉडबॅण्डचा ब्रॅण्ड ऍंबासिडर ;) (साभार सुझे..)
श्रीताई - वूलन (स्वेटर्स स्पेशलिस्ट) (साभार देचु)
अनुजा पडसलगीकर - मस्कत डिस्कव्हरी चॅनल CEO
अपर्णा संखे - रेफ्री, अंपायर, (दीप, सुझे), अपर्णा 'गाणी आणि आठवणी' हा रंगारंग कार्यक्रम रेडीओ वर करेल ;)
भामुं - लाल टोप्या विकणार ... :D आणि पार्ट टाईम ओरिगामी क्लासेस....
अनुजा सावे - फूड इनस्पेक्टर ;)
रोहन चौधरी - ट्रेकिंग एक्स्पर्ट ऍड्व्हाईस ;)

Saturday, 31 July 2010

पुस्तकः अमेरिका - अनिल अवचट

अनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.

इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.

तिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्‍या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.

भारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.

"अमेरिका"
लेखकः अनिल अवचट
मॅजेस्टीक प्रकाशन

Thursday, 10 June 2010

लिमका २०१०

लिमकाची प्रत्येक जाहीरात वेधक असते..
ही अशीच एक सुंदर जाहीरात.

Saturday, 15 May 2010

फोबिया

फोबिया
an anxiety disorder characterized by extreme and irrational fear of simple things or social situations

फोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी.  यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात.  मलाही एक(?) विचित्रच फोबिया आहे.

आधीपासुन आधीचं सांगतो,  लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल.  इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली. 

शाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्‍य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्‍या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.

सद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे.  मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.

तर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.