Thursday, 24 December 2009

संगीत...

संगीत...
शिनुमा सोडुन माझा बेस्ट छंद म्हणजे संगीत ऐकणे.  घरी भावाला सुद्धा भारी वेड, त्याला जेव्हा एक टेंपररी नौकरी लागली, त्याने पहील्या पगारात एक टेप रेकोर्डर विथ स्पीकर्स घेतला.
तो आम्ही आमच्या खोलीत ठेवला, जी आम्ही आजी सोबत शेअर करत असु.  मग काय नव्याचे वेड म्हणुन रात्री १-२ वाजे पर्यंत गाणे ऐकायचो (अर्थात सौम्य आवाजात)... पण आजीला याचा त्रास व्ह्यायचा...तिच्या सेल्फ़ भजनांना प्रतिबंध यायचा.  भावाच्या दर पगारीच्या दिवशी आम्ही दोघे मेन मार्केटच्या कॅसेट सेंटर वर जाउन, लेटेस्ट कॅसेट्स घेवुन येत असु (त्यानंतरच उरलेले पैसे बाबांकडे जायचे :) ).  त्याकाळी आमच्याकडे जवळपास ३५०-४०० कॅसेट्स जमल्या होत्या.  माझ्या भावाला त्या कॅसेट्स त्यांच्या प्लॅस्टीक कवर सहीत जपुन ठेवण्याची आवड होती.  घरी येणारे प्रत्येक मित्र त्या कॅसेट्सची तारिफ करायचे, कारण प्लॅस्टीक कवर मुळे त्यांचे पोस्टर्स चांगले दिसायचे.  आता मला घर सोडुन ६ वर्ष झालीत.
परवा घरी असताना त्या कपाटात त्या कॅसेट्स दिसल्या..पण धुळ खात पडल्या होत्या.  सीडी प्लेयर, लॅपटॉप मुळे कुणीही त्याकडे ढुंकुन पाहत नव्हते. :)
नाहीतरी मनपसंद गाण्यासाठी वाट पहा किंवा एक बाय एक गाणे फॉरवर्ड कोण करणार... झटपट सगळं पाहीजे.  त्यामुळे या कॅसेट्स मागे पडल्या...
मी एकडे हैदराबादला आल्यावर टीवी किंवा म्युजीक प्लेयर नव्हता, मोबाइल, आईपॉड केवळ श्रीमंताकडे असायचे, थोडक्यात परवडायचे नाही.  सोपा पर्याय एकच होता तो म्हणजे एफ़ एम... इथे पण गोची.  फक्त एकच चॅनल, आकाशवाणी.  त्यावर अठवडयातुन केवळ १-२ तासच हिंदी गाने लागायचे.  बाकी पुर्ण वेळ तेलुगु.  मग हळुहळू प्रायवेट चॅनल सुरु झाले.
मग मी नोकीयाचा एफ एम फोन घेतला, ऑफ़ीसला जाताना जो वेळ बस मध्ये लागायचा त्यात खुप मोलाची साथ दिली मोबाईल आणि एफ़ एम ने.  पण हळुहळु कामाचा व्याप वाढु लागला आणि सर्व सोयी असताना ( सोनीचा म्युजिक सिस्टीम आहे आता) देखिल एकायला वेळ मिळेनासा झाला....

या सर्व आठवणी येण्याचे कारण म्हणजे खुप दिवसानंतर आज एफ़ एम ऐकलं, रेडीओ सिटी वर खुपंच मस्त गाणे चालु होते, मो. रफी पासुन जगजीत सिंग पर्यंत मनाला भिडणारे गाणे.
अतिशय उत्तम.  आज काल बहुतेक ३-४ तासच हिन्दी गाणे येतात पण त्यात जुने गाणे ऐकायला मिळणे ही पर्वणीच...

--आनंद

6 comments:

 1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद केतकी. जुन्या गाण्याचा मी फ़ॅन आहे...

  ReplyDelete
 2. ओह्ह्ह... तुम्ही दक्षिण राज्यात आहात तर... सहाजिक आहे की हिंदी गाणी ऐकायला मिळणं म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणीच असणं. मराठी लिहायला, वाचायला, ऐकायला तरसत असाल तुम्ही... (हे अंदाज मी बंगळूरुला असताना आलेल्या अनुभवांवरुन बांधतो आहे.)

  ReplyDelete
 3. हो ना सौरभ!
  मराठी ब्लॉग्स खुप मदत करतात :)
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 4. माझासुदधा लहानपणी जमवलेला पॉकेटमनी कॅसेट खरेदी करण्याच्या सत्कार्यीच लागत होता...हि पोस्ट वाचुन ते दिवस आठवले...

  ReplyDelete
 5. धन्यवाद देवेंद्र्जी, खुप सुंदर दिवस होते ते नं ?

  ReplyDelete