Sunday, 14 March 2010

विचार

मनातले विचार लेखणीद्वारे (पक्षी : किबोर्ड) कधी उमटतच नाहीत... ’संस्कार’ नावाच्या एका पुस्तकात वाचले होते, मानवास दोन प्रकारचा वेगवेगळा शब्द संग्रह असतो.
एक वाचण्याचा आणि दुसरा लिहिण्याचा, म्हणुनच आपण मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतले अनेक शब्द वाचु शकतो, मात्र लिहिताना बरेचदा शब्द आठवतच नाहीत.
माझ्या बाबतीत तरी हे सत्य आहे, माझ्या मते मी वाचक म्हणुनच बनविला गेलो असणार आहे :-)....

6 comments:

  1. अरे आनंद. . . वाचणारं कोणी तरी आहे म्हणून लिहिण्यात मजा आहे.. . .त्यामुळे चांगल वाचक असण हे सुद्धा चांगल लेखक असण्याप्रमाणेच आहे. . .अस मला वाटत बर का??

    ReplyDelete
  2. @मनमौजी, हो तर, वाचक महत्वाचे आहेतच!! :-)
    पण मला ब्लॉगवर लिहिताना खुप वेळ खर्चावा लागतो...
    प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!

    ReplyDelete
  3. हम्म्म... मला नाही वाटत असं. वाचताना आपण समोरच्याचे विचार वाचत असतो, त्यामुळे शब्द काय असावा किंवा असेल ह्याचा विचार करावा लागत नाही. किंबहुना लिहणाऱ्याने काय शब्दरचना केली आहे हेही दुर्लक्षित होते. मात्र स्वतः लिहताना भाव शब्दात मांडताना ते विचार करावे लागतात (शक्यतो काही मनात नसताना लिहायच म्हणून लिहतोय अश्यावेळी). अन्यथा भाव आपोआप शब्दरुप होऊन उतरतात...

    ReplyDelete
  4. सौरभ, असे नाही बरंका. पुलं लिहितात त्या पद्धातिने आपण लिहु शकतो का? प्रसंग मात्र आपल्या पाहण्यातलेच ते लिहितात ना ?
    ते म्हणतोय मी....

    ReplyDelete
  5. आनंद, मी तुझी परीक्षणं तुझ्या canvas ब्लॉगवर वाचली आहेत. आणि त्यावरून सांगतोय की तू आरामात लिहू शकतोस. प्रयत्न कर नक्कीच जमेल..

    बाकी तुमच्यासारखे वाचक आहेत म्हणून तर लिहायला मजा येते ना आम्हाला :-)

    ReplyDelete
  6. हेरंब, तुझ्या आवर्जुन प्रतिक्रियेमुळेच हुरुप येतो बघ...

    धन्यवाद वाचक म्हणुन... तु तर काय भन्नाट लिहितोस...

    ReplyDelete