फोबिया
an anxiety disorder characterized by extreme and irrational fear of simple things or social situations
फोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी. यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात. मलाही एक(?) विचित्रच फोबिया आहे.
आधीपासुन आधीचं सांगतो, लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल. इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली.
शाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.
सद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे. मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.
तर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.
Mastach re dada...!!! Itka chaan phobia suddha asu shakto...?? ;)
ReplyDeleteAani ho mi ti khadadi warachi delete keleli post publish keliye...sorry han tevha tuzya comment la uttar dyayache rahunach gele...
धन्यवाद मैथिली.. बरं झालं हे छान आहेत असे म्हणालीस.. ;-)
ReplyDeleteवाचतो ती खादाडी पोस्ट आता...
ह्याले मीतरी प्फोब्य न्हाय म्हन्नार... नविन जानून घ्याची उत्सुक्ता, जिज्ञासा किंवा कुतुहल म्हन्ता यील... आन ते आस्लबी पायजेल... प्रोग्रामिंग लॅंग्वेजच्या बाबतीत माकापन असच वाट्टं...
ReplyDeleteऐकुन बरं वाटलं सौरभ... फायद्याचा आहे हा फोबिया.. हे खरं
ReplyDeleteतुझे फोबिया फायद्याचे आहेत. वाईट नाहीत. पण विषयाला सोडून थोडं...मला पर्सनली क्लॉस्ट्रोफोबिया इन्टरेस्टिंग वाटतो...त्याचा संदर्भ असलेला Kontroll हा हंगेरियन चित्रपट जरूर पहा. मला थोडासा क्लॉस्ट्रोफोबिया आहे अशी ऑकडि मला आहे! ;)
ReplyDeleteबाबा प्रोफेटा, तुला सिनेमा पाहुनच प्रतिक्रिया देतो.
ReplyDeleteHa phobia nasun philia zala. Since you are wanting to read more, learn more and grasp more.
ReplyDeleteG Thanks for visiting.
ReplyDeleteफोबिया म्हणण्याचे कारण म्हणजे त्याबद्दल वाटणारी भिती.. सरळ वाचणे, सिनेमा पाहणे हे उत्तम ना..
हा फोबिया मला आवड्ला! माझ्या सगळ्या फोबियांपेक्शा नक्कीच बरा आहे! :)
ReplyDeleteधन्यवाद शाल्मली... ब्लॉगवर स्वागत...
ReplyDeleteखरच मस्त फ़ोबिया आहे तुझा...
ReplyDeleteधन्यवाद देवेन... :-)
ReplyDeleteमाझ्या मते हे म्हणजे जगातल्या सर्वोत्कृष्ट फोबियाचं उदाहरण आहे. उगाच उंचीची, वेगाची, पाण्याची भीती या अशा फोबियांपेक्षा तुझं हा फोबिया कसला मस्त आहे.. !!
ReplyDeleteधन्यवाद वटवट सत्यवाना... न्यायाधिशांनी निकाल दिलाय म्हणजे शिक्कामोर्तबच फोबीया चांगला असण्यावर....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअसाही फोबिया असतो हे आजच कळलं ;)
ReplyDeleteपण मस्त आहे बर का :)
विक्रम, बरं झालं मला वाटलं कैच्याकै म्हणशील ;)
ReplyDeleteधन्यवाद प्रतिक्रियेकरिता...
वेगळ्या विषयावर छान लिहील आहे!
ReplyDeleteहा असा फोबिया फायदेशीरच आहे! नवीन आणि चांगल वाचायला मिळावं असं वाटलं तर ज्ञानात भरच पडेल! क्षितिजं विस्तारतील!
अनुजा, ब्लॉगवर स्वागत.. आणि जुन्या पोस्टवर आवर्जुन प्रतिक्रियेसाठी अत्यंत आभार.....
ReplyDeletenice one
ReplyDelete