Tuesday, 5 April 2011

पूनम का चांद

पूनम पांडे.. बस नाम ही काफी है!.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं!!! या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...
आफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की 
आपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)
इथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)

31 comments:

  1. कड्डक कड्डक एकदम कड्डक
    (कौन कड्डक?? तुझा लेख आणि पुनम पांडे दोनो...) ;) :P :D

    ReplyDelete
  2. आयला लय सुपरफास्ट प्रतिक्रिया.. पूनम आणि माझ्यातर्फे धन्यु व्हेरी मच!!! ;)

    ReplyDelete
  3. सॉलीड भाय ...क्या लिखेला है ....तो ये है अंदरकी बात ... ;)

    ReplyDelete
  4. शॉल्लिट एकदम......खतरनाक लॉजिक आहे...ए भाऊ तू आधी प्रोगामिंग करायचा का रे?? (हे पेस्तनजी म्हणायचे त्या चालीवर वाचायचं हं?....:))

    ReplyDelete
  5. आमच्या विश्वसनीय वार्ताहराने शेवटी दडवलेली ब्रेकिंग न्यूज आज फोडलीच...पुनम पांडे लवकर बरी होवो हे देवाकडे प्रार्थना ;-)

    ReplyDelete
  6. हाहाहाहाहा एकदम भारी....

    ReplyDelete
  7. साष्टांग नमस्कार देवानू :)

    ReplyDelete
  8. हा हा हा हा हा मस्त रे
    टायटल जबरदस्त

    ReplyDelete
  9. होय देवा.. यही है राईट चॉईस बेबी. आपलं यही है अंदर की बात... खूप खूप धन्यवाद बझवर शेअर केल्याबद्दल :)

    ReplyDelete
  10. धन्स ऍप्स.. प्रॉग्रामिंग जमो न जमो.. चावटपणा पुरेपूर जमतो हे नक्की ;)

    ReplyDelete
  11. >> पुनम पांडे लवकर बरी होवो हे देवाकडे प्रार्थना ;-)

    अरे परत तेच देव (सचिन तेंडूलकर) एकपत्नीव्रता आहे.. त्यामुळे तो इथं मदत करणार नाही :D

    आभार सुझे

    ReplyDelete
  12. आभार्स इंद्रधनू आणि ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  13. आभार्स विशालब्वा आणि ब्लॉगवर स्वागत ;)

    ReplyDelete
  14. राजे ब्लॉगवर स्वागत.. शॉलीडचं लिक्वीड होईल जर पूनम बाय आल्या ;)

    ReplyDelete
  15. हाहा सागरा.. टायटल ट्रॅक पण भारी आहे बरं ;) हाभार्स... :P

    ReplyDelete
  16. बच्चोंको भडकाया और खुद बुझ गयी? कमाल करती हो पांडेजी?

    ReplyDelete
  17. कमीटमेंट नाहीये यार... चुलबुलला सांगावं लागेल ;)

    ReplyDelete
  18. अप्पा...षटकार हाणला आहेस...लय भारी

    ते काय बी माहित नाय...रडी खेळायच नाय..पुनम ला लवकर बरी करा रे :) :)

    ReplyDelete
  19. यवगेशा आभार.. पूनमला तुझ्या बेकरीची सफर करवून आण.. मग ती ठणठणीत बरी होईल ;)

    ReplyDelete
  20. हा हा हा हा हा

    ReplyDelete
  21. आभार स्नेहल आणि ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  22. मला कमेंटायला लेट झाला दादानुं..पन तुमी माफ कराल ठाव हाय....
    लई झ्याक लिहीलया रावं....पुनम का चांद....बघण्यास इथले वीर किती उत्सुक होते तेही सांगाव महाराजा ...;)

    ReplyDelete
  23. आम्हाला वर्ल्डकप हवा होता.. सोबत फेम येतेच ;)
    माऊताई आभार्स!

    ReplyDelete
  24. वाह...वाह...ही अंदरकी बात फोडल्याबद्दल आभारी...
    एक सचिन सोडला तर बाकी सगळे जन तिच्या साठी खेळले असण्याची शक्यता आहे.
    सचिनची कारकीर्दच तिच्या वयाहून जास्त आहे.

    ReplyDelete
  25. धन्यवाद सागर.. ब्लॉगवर स्वागत...
    अरे सगळे विश्वकपासाठीच खेळले.. मी उगा कैच्याकै लिहिलंय :)

    ReplyDelete
  26. आयला.. फिक्सिंग फिक्सिंग म्हणतात ते हे होय??? खोका-पेट्यांच्या फिक्सिंगचा जमाना संपला म्हणायचा !!! ;)

    ReplyDelete
  27. ह्या फिक्सिंगमध्ये जास्त रिस्क आहे भावा ;)

    ReplyDelete
  28. कोणत्या हास्पिटलात हाय रे भाउ??

    ReplyDelete
  29. दीपक तुला आता डॉक्टर व्हावसं वाटू लागलंय ना? :D

    ReplyDelete
  30. हाहा... हे गाजर लटकवलेलं व्हतं का... तरीच! :D:D

    मी मायदेशी होते नं हे त्यामुळे या गुपितावर कमेंटायला लेSSSट झालाय... माफी!

    ReplyDelete