Saturday, 31 July 2010

पुस्तकः अमेरिका - अनिल अवचट

अनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.

इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.

तिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्‍या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.

भारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.

"अमेरिका"
लेखकः अनिल अवचट
मॅजेस्टीक प्रकाशन

14 comments:

 1. अनिल अवचटांनी लिहल आहे ना मग भारीच असणार पुस्तक...त्यांच माणुस पुस्तकातल हृद्यद्रावक लिखाण वा्चुन एकदम आतुन हललो होतो मी...लवकरच वाचाव लागेल..

  ReplyDelete
 2. अनिल अवचट अप्रतिम लिहतात...मी नुकतच त्यांच "पुर्णिया" वाचल मस्त आहे.

  ReplyDelete
 3. होय, अतिशय सुंदर पुस्तक आहे... वाचावच असं..
  धन्यवाद देवेन आणि योगेश....

  ReplyDelete
 4. मी आजवर अनिल अवचटांची कीर्ती लय ऐकून आहे...आता पुस्तकही वाचावं लागणार!

  ReplyDelete
 5. ऐकुन ? बाबा वाचले का नाही ?

  ReplyDelete
 6. Never heard of this.Reading Lost Symbol by Dan Brown,nice one.BTW no new post on Canvas?

  ReplyDelete
 7. अमेरिका हे अवचटांच्या काही उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे. मला खात्री होतीच की तुला आवडणारच. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे हे.. !!!

  ReplyDelete
 8. Thanks Anee for visiting here.. Yesterday posted on 'canvas' for kramer vs kramer.

  ReplyDelete
 9. हेरंबा तुला धन्यु रे...

  ReplyDelete
 10. 'अमेरिका'अजून वाचले नाही परंतु हि पोस्ट वाचल्यावर नक्कीच वाचावे असे वाटत आहे आणि लवकरच ते वाचले जाणार यात वाद नाही :)
  धन्यवाद

  ReplyDelete
 11. धन्यवाद विक्रम... जरूर वाच...

  ReplyDelete
 12. अनिल अवचटांचे पुस्तक आणि तूझे आणि हेरंबचा ’पुस्तक वाचा’ असे मत म्हटल्यावर पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे... :)

  ReplyDelete
 13. नक्कीच... प्रतिक्रियेकरिता खुप आभार

  ReplyDelete
 14. पुस्तक अप्रतिम आहे ... आम रिकेला जाणाऱ्यानी वाचायला हवे असे ... :)

  ReplyDelete