अनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.
इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.
तिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.
भारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.
"अमेरिका"
लेखकः अनिल अवचट
मॅजेस्टीक प्रकाशन
Saturday, 31 July 2010
Thursday, 10 June 2010
Saturday, 15 May 2010
फोबिया
फोबिया
an anxiety disorder characterized by extreme and irrational fear of simple things or social situations
फोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी. यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात. मलाही एक(?) विचित्रच फोबिया आहे.
आधीपासुन आधीचं सांगतो, लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल. इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली.
शाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.
सद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे. मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.
तर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.

Friday, 30 April 2010
Wednesday, 21 April 2010
किसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम

गेल्या दोन वर्षांपासुन ऑफिस, रुम, आणि घरी (गावी) दोन दिवसाची सुटी सोडुन वेगळं काही केलंच नाही. मित्रांना हजारवेळा सांगुन सुद्धा एकाही सहलीचा प्लॅन बनला नाही. गोवा, कन्याकुमारी, जयपुर पासुन गेल्यागावी श्रीशैलमला तरी जाउया म्हणुन मित्रांना म्हटले, पण त्यांच्या व्यापांमुळे कधीच प्लॅनचे प्रत्यक्षात अवतरण झाले नाही.
माझ्या बाजुला राहणारी तेलुगु बॅचलर पार्टी मात्र विकांत मजेत साजरी करत असते. असेच एकदा त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी विशाखापट्टणमला केलेल्या सहलीचे फोटो दाखविले आणि सोबत काय काय धमाल केली ते पण सांगितले, मग काय मी लगेच त्यांना त्यांच्या पुढील प्लॅनिंग बद्दल विचारले. त्यांच्या प्लॅनिंग डायनॅमिक असतात केवळ दोन-तीन दिवस आधी माहिती होते. मी म्हटलं मग जेंव्हा केंव्हा निघणार असाल मला गृहीत धरा.
३-४ दिवसांपुर्वी रेड्डीचा फोन आला, या रवीवारी तयार रहा, किसारागुट्टाला जायचे आहे म्हणाला. किसारागुट्टा माझ्यासाठी नविन प्रकरण होते, नेमके तिथे काय आहे, आणि या उन्हाळ्यात काय मजा येणार असे वाटुन गेले, पण घरात बसुन ४०-४२ डिग्रीमध्ये वेगळे काय साधनार होतो, म्हणुन मग निघालो.
किसारागुट्टा हे हैदराबादपासुन २०-२५ कि.मी.वर असणारे एक स्थळ आहे, इथे टेकडीवर महादेवाचे मंदीर आहे. टेकडीखाली काही शेती आहे. सकाळी सातला तयार होऊन मित्राकडे पोचलो, तिथुन एका नियोजीत ठीकाणाहुन मोटारसायकली घेतल्या आणि तब्बल नऊ मोटारसायकलींवर अठराजणांचा जत्था किसारा कडे निघाला. त्यातले पाच कपल्स आणि बाकी आठ बॅचलर्स होते. प्रत्येकाजवळ ३-४ किलो वजनाची एक पिशवी, ज्यात पाण्याच्या बाटल्यांपासुन, मसाले, खाणसामान आणि इतर अनेक गोष्टी होत्या.
टेकडीखाली पठ्ठ्यांनी आधीच एक शेत हेरुन ठेवलं होतं. मस्तपैकी भाताची शेती, जवळच पाण्याची मोटार, आणि प्रशस्त असा एक वृक्ष, या वृक्षाखालीच आमचे बस्तान बसले. थोडीफार साफसफाई वगैरे करुन त्यावर चटई अंथरली, मस्त पैकी बैठक जमली, तेलुगु हास्यकल्लोळात मीही अर्धेअधीक समजत नसताना पार मिसळुन गेलो होतो, नाही म्हणायला एक मित्र जोकचे हिंदी रुपांतरण अधनं मधनं सांगत होताच. सर्वप्रथम गप्पाष्टकांसोबत पुरी, भाजी आणि टोमॅटो चटणी न्याहारी साठी हाणली, तेलुगु लोकांनाही पुरी जमते बरं :-), घरघुती असल्यामुळे ती अप्रतिम होतीच.
खाणं उरकल्यावर थोडी शेतात भटकंती झाली, उन्हाळ्यामुळे इतर काही नव्हतं पण भाताची शेती जोरात होती, आणि भरपुर पाण्यामुळे हवाही थंडगार होती, फिरायला मजा आली. त्यानंतर दुपारच्या मेन जेवणाची तयारी सुरु झाली, तिथेच झाडाखाली एक मोठी आणि एक छोटी अशी साध्या दगडांची चूल तयार करण्यात आली. वेगळ्या वेगळ्या पोतडीतुन मग भांडी, चमचे, मसाले, आणि जेवण बनविण्याचे हरेक सामान निघायला सुरुवात झाली. मेन्यू मोठा होता मटण, फिश फ्राय मांसाहारींसाठी तर शाकाहारींसाठी पनीर मसाला, साधा भात आणि बगारा राईस (थोडक्यात मसाला भात).
विशेष म्हणजे मांसाहारी पदार्थ बनविनारा आमचा शिवा हा मित्र संपुर्ण शाकाहारी आहे, पण जेवणाला काय चव.. एकदम भन्नाट.
आम्ही (ज्यांना खाणं फक्त खाता येते) लोकांनी बाकी तयारी होईस्तोवर सरपणाची व्यवस्था केली, आणि तिकडे खाणं बनविने सुरु असताना काही जण पत्ते कुटत बसले. चुलीवर भांडी काळी होऊ नयेत म्हणुन त्याला शेतातली ओली माती बाहेरुन लावण्यात आली, किती सोपी आयडीया आहे ही. मी त्यांचं कौतुक केलं तर ते हसु लागले, म्हणाले अरे ही काही आम्ही शोधलेली पद्धत नाही, खेडेगावी असेच वापरतात. मग माझ्या (मठ्ठ?) डोक्यात नवी माहिती जमा झाली. मग काय तास दोन तास केवळ सुवास भरुन राहीला होता, अप्रतिम असं जेवण तयार होतं. मग काय काहीही वेळ न घालवता आम्ही त्या सुंदर जेवणावर यथेच्छ ताव मारला. जेवता जेवता हास्यकल्लोळ चालु होता, पण तेलुगुतुन असल्यामुळे मला फार थोडा कळत होता. पण जेवण अतिशय रुचकर असल्यामुळे मी जास्त लक्ष खाण्याकडे दिले.
जेवणं झाल्यावर आवराआवरी सुरु झाली, तोपर्यंत ४ वाजले होते, अजुन गप्पाष्टकं चालली. ५ च्या सुमारास उन्हाचा पारा थोडा कमी झाला, आणि मग थोडे खेळ खेळण्याचं ठरलं. सर्वांकडे एक एक फुगा देउन त्याला फुगवायला सांगितलं, सर्वांचे फुगे फुगवुन झाल्यावर असं सांगितलं गेलं की आता एकमेकांचे फुगे फोडायचे आणि आपला फुगा फुटू नाही द्यायचा, ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील किंवा सर्वात शेवटी फुटेल तो जिंकला, त्याला रु. १००/- असे घसघशीत बक्षीस देण्यात येईल ;-). मग काय प्रचंड धुळीचा लोट उडवत, आम्ही ज्याचे दिसतील त्यांचे फुगे फोडायच्या मार्गावर लागलो.
मी अपेक्षेप्रमाणेच लवकर हरलो, आणि दुसर्यांच्या फुग्यांच्या मागे लागलो, पण या खेळात मस्त मजा आली, कपडे मात्र धुळीने पुर्ण माखुन गेले होते. त्यानंतर हौजी खेळलो, टिकीटांच्या पैस्यातुन बक्षीसं ठरली, परत तिथे सुद्धा जिंकता जिंकता हरलो, पण मजा मात्र खुप आली. लहान मुलांसारख खेळताना खरंच खुप मजा आली आणि या प्रचंड धावपळीच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी महान आनंद देऊन जातात ते कळालं.. खरंच खुप अप्रतिम वेळ गेला.
सातच्या आसपास तिथुन निघालो आणि मित्राच्या घरी आलो, मग परत तिथे साधा भात आणि अप्रतिम साधं वरण आणि तूप हाणलं, नंतर टरबुज आणि अमुलचे सुंदर बटर स्कॉच आईसक्रिम हादडले. रात्री दहाच्या आसपास पेंगुळलेल्या अवस्थेत घरी पोचलो, आणि दिवसभराच्या थकव्याने पण उल्हासित, तजेलदार मनाने पलंगावर झोपी गेलो.

Saturday, 10 April 2010
Tuesday, 16 March 2010
Sunday, 14 March 2010
विचार
मनातले विचार लेखणीद्वारे (पक्षी : किबोर्ड) कधी उमटतच नाहीत... ’संस्कार’ नावाच्या एका पुस्तकात वाचले होते, मानवास दोन प्रकारचा वेगवेगळा शब्द संग्रह असतो.
एक वाचण्याचा आणि दुसरा लिहिण्याचा, म्हणुनच आपण मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतले अनेक शब्द वाचु शकतो, मात्र लिहिताना बरेचदा शब्द आठवतच नाहीत.
माझ्या बाबतीत तरी हे सत्य आहे, माझ्या मते मी वाचक म्हणुनच बनविला गेलो असणार आहे :-)....

Monday, 8 March 2010
छंद 1
माझ्या लहानपणाचे छंद वेगळेच होते, मला इतरांना सांगायची लाज वाटायची.
चित्रकलेची आवड होती, पण चित्रपटांच्या आकर्षणामुळे मला नुसती चित्र काढण्यापेक्षा सिनेमाची पोस्टर काढायचा छंद जडला.
दुरदर्शनवर चित्रहार मध्ये गाणे चालु होण्यापुर्वी केवळ काही सेकंदासाठी त्या सिनेमाचे पोस्टर दाखवायचे, ते पाहुन गाणे संपण्यापुर्वी मी जवळपास हुबेहुबपणे चित्रपटाचे नाव पाटीवर काढायचो.
नाव म्हणजे नुसते नाव नाही, त्याच्या योग्य फॉन्ट सहीत. यासाठी मला दगडी पाटी फार आवडायची, प्लॅस्टीकची पाटी कधी नाही आवडली.
मग काही दिवसांत मी पेन्सिल वापरुन अजुन ठीकठाक पोस्टर्स काढु लागलो. मग काय, एखाद्या चित्रपट थिएटर मध्ये जसे पोस्टर्स चिकटवले जातात त्याप्रमाणे घराच्या भिंतीवर चिकटवणे सुरु झाले.
मग त्यासाठी ओरडा खाल्ल्यावर मात्र हे उद्योग बंद झाले. त्यानंतर सर्व पोस्टर्स एका पत्र्याच्या पेटीत ठेवायला सुरुवात केली. उन्हाळयाच्या सुट्टीत मामाकडे गेलो असताना इकडे ती पेटी कुठे अंतर्धान पावली ते आजपर्यंत कळाले नाही... त्यानंतर कुठेतरी स्क्रीन पेपर बघायला मिळाला आणि पानंभर चित्रपटाचे मोठे पोस्टर पाहुन डोळे दिपुन गेले. त्यानंतर प्रत्येक शनीवारी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन जवळील स्टॉलवरुन स्क्रीन पेपर आणण्याची सवय लागली. त्यातही चांगले पोस्टर्स मी परत एका ब्रिफकेस मध्ये जमा केले होते, कालांतराने अभ्यासाच्या गर्दीत ते सर्व नाहीसे झाले, आणि माझा हा छंद सुटला. आता त्यातले मी स्वत: काढलेले काही अप्रतीम(मला वाटलेले ;-) ) आलेले पोस्टर्स सुद्धा नाहीत याची खंत वाटते.

Saturday, 27 February 2010
रोड, मुवी
रोड, मुवी
अभय देओलचा ’रोड, मुवी’ येतोय, टोरंटो फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवला गेलेला हा चित्रपट चांगला असणार यात शंकाच नाही...
सर जो तेरा चकराये......
http://www.youtube.com/watch?v=nUBwfcYR2-I

Wednesday, 10 February 2010
बजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात
बजाज डिस्कवर या बाईकच्या जाहीराती खुपंच कल्पक असतात. शनी शिंगनापुरबद्दलची ही जाहीरात अशीच सुंदर आहे....
Tuesday, 2 February 2010
ओपनिंग क्रेडीट्स -१
कुठल्याही चित्रपटासाठी, मालिकेसाठी ओपनिंग क्रेडीट्स अत्यंत महत्वाचे असतात, मुख्य अभिनेत्यांच्या नावासकट इतर महत्वाच्या क्रेडीट्स करिता यांचा चांगला उपयोग होतो. यातही केवळ नावं न दाखवता खुप सुंदर प्रयोग झाले आहेत, ओपनिंग क्रेडीट्स मध्येच सिनेमाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात येतो, आणि दिग्दर्शकाची कमाल दिसुन येते. इथे वानगीदाखल अशा काही विशेष ओपनिंग क्रेडीट्स बद्दल आपण पाहु. तुम्हालाही एखादा असा सिनेमा आणि त्यातील ओपनिंग क्रेडीट्स आठवत असल्यास जरुर लिहा....
चित्रपट - लॉर्ड ऑफ वार (२००५)
२००५ सालच्या या चित्रपटाचा विषय आहे, शस्त्र आणि त्यांच्या घातक परिणामांबद्दल. या सिनेमाच्या ओपनिंग क्रेडीट्स मध्ये एक बुलेट रशियाच्या एका कारखान्यात कशी बनते, बनल्यानंतर आफ्रिकेला पाठवली जाते आणि शेवटी एका अफ्रिकन मुलाचा कसा जीव घेते हे दाखवले आहे...
क्रमश:

Monday, 11 January 2010
अभिरुचीहीन
महाराष्ट्रात कुठेतरी...
अभिरुचीहीन प्रेक्षकांमुळे ’नटरंग’ सारखा सिनेमा केवळ एका अठवड्यात खाली उतरविला जातो आणि त्या जागी एका मसाला,बिभत्स दाक्षीणात्य सिनेमा लागतो.
वैचारीक दारिद्र्याची लक्षणं..अजुन काय. हैदराबादला असल्यामुळे इथे तर नाही पाहता येणार, आता मुंबई, पुण्यालाच जावे लागणार का ?

Thursday, 7 January 2010
बंद, तोड्फोड आणि सामान्य माणुस
वेगळ्या तेलंगाना राज्याच्या मागणीमुळे आंध्र प्रदेशात गेल्या एक महीन्यापासुन अस्थीरतेचे वातावरण आहे.
या काळात तब्बल पाच वेळा बंद पुकारण्यात आला, आणि ठिक-ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
तेलंगाना आणि आंध्रा भागात अनेक बसेस तोडल्या, फोडल्या गेल्या, बर्याच जाळल्या गेल्या, या सर्वाची परिणीती म्हणजे बस सेवांच्या दरात झालेली वाढ.
ती ही साधारण नाही तर २५%, म्हणजे काही राजकीय पक्षाच्या स्वार्थी हेतुपायी सामान्य जनतेलाच हाल सोसावे लागणार आहेत.
बंदच्या काळात बसेस, लोकल रेल्वे सेवा नसल्यामुळे आधीच जास्तीचा खर्च ट्रांसपोर्टेशन वर खर्च करुन, न केलेल्या चुकांबद्दल त्याच्याकडुन वसुली होत आहे.
बंद्च्या या दुष्टचक्रातुन लोकं कधी शिकणार आहेत?, राजकीय बंद ला सपोर्ट देण्यापुर्वी विचार आवश्यक आहे.

Monday, 4 January 2010
नटरंग आणि झेंडा
नटरंग आणि झेंडा, जानेवारीत प्रदर्शीत होणार्या या दोन्ही चित्रपटाचे संगीत हा मुख्य बलस्थान आहे.
काल लोकल मध्ये येताना नटरंग चे टाइटल गाणे ऐकले, अजय-अतुल चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
त्यानंतर ’खेळ मांडीला’ हे ऐकले, खुप सुंदर...
झेंडा मधील, ’झेंडा कुणाचा घेवु’ एकदम मस्त आहे...त्यानंतर शेतकर्याची शोकांतिका ’पत्रास कारण की...’ ऐकुन भर प्लॅटफॉर्मवरच रडु कोसळले.
काय बोलावे...

Subscribe to:
Posts (Atom)